'प्रसारमाध्यमांतील आधुनिक प्रकारची वेठबिगारी'

प्रसार माध्यमामध्ये सध्या आधुनिक प्रकारची 'वेठबिगारी' फोफावली आहे.  काही ठिकाणी इन्टर्नशिपच्या नावे तर काही ठिकाणी ट्रेनीच्या नावे हा प्रकार सर्रास घडताना दिसत असल्याने नवोदित पत्रकारांप्रतीची श्रमप्रतीष्ठा पायदळी तुडवली जात आहे.
               सप्टेंबर महीन्यात 'मी मराठी '  आणि  'जय महाराष्ट्र'  या वृत्तवाहीन्यांनी मुलाखती घेतल्या, त्यातही हाच प्रकार दिसुन आला. ' बीजेपी'  माझा मधुन जय महाराष्ट्र मध्ये गेलेल्या प्रसन्न कुमारांनी जाता जाता माझाचा काही डेटाही पळविला आहे. त्या डेटाच्या आधारे, उमेदवारांना मुलाखतीसाठी जय महाराष्ट्र मध्ये बोलावण्यात आले होते.
'माझा'ने गेल्या काही महीन्यापूर्वी  पुण्यातील गरवारेत  परीसर मुलाखती घेतल्या,त्यापैकी  शेवटच्या फेरीपर्यंत पोचलेल्या पण  बीजेपी माझाने नाकारलेल्या उमेदवारांना  जय महाराष्ट्र मध्ये फोन करुन बोलावण्यात आले होते. मुलाखती तर झाल्या पण ज्याची निवड केली त्यांना  या  स्पष्ट बातमी  (जय महाराष्ट्र ) वाल्यांनी  त्या उमेदवारांना चक्क एक हजार रुपये प्रतीमहिना अशा तऱ्हेने तीन महिने काम करा नंतर काम बघुन तुमचा विचार करु असे सांगीतले.  असे ऐकतांना त्या उमेदवारां नोकरी मिळण्याच्या आनंदापेक्षा भविष्याच्याच्या  चिंतेनेच अप्रसन्न वाटु लागले.

              तिकडे मी मराठीनेही 'मी'पणा लावुन धरत ज्या उमेदवारांची निवड केली त्यांना सात हजार पाचशे रुपयांत काम करण्यास सांगीतले. 'मी' वाले बहाद्दर कदाचीत मुंबईतील महागाईपासुन अनभिज्ञ असतील किंवा त्यांच्यासाठी हे नविन उमेदवार हक्काचे वेठबिगार असतील .

                   झी२४ तासने पुण्यातील रानडे मध्ये मुलाखती घेवुन आज दहा महीने झाले तरी  उमेवारांच्या निवडीसंदर्भात कोणताही जबाबदारीपुर्वक निर्णय किंवा अहवाल संबधीतांना न पाठविल्यामुळे झी २४ तासचे  एक पाऊल पुढे ऐवजी १०० पाऊले मागे गेली की काय असा प्रश्न निर्माण होऊन पुरती नाचक्की झाली आहे.

            अशा प्रकारच्या आधुनिक प्रकारच्या वेठबिगारीचा  पुरस्कार करणाऱ्यांना काहीतरी धडा मिळाला पाहीजे अशी चर्चा जोर धरु लागली आहे.