धन्य ते पोलीस आणि धन्य ते पत्रकार ...


अकोला जिल्ह्यात वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत,  एका बालकाला तसेच एका महीलेला बसस्थानक समोर एका वाहनाने चिरडले. या घटनाचे वृत्त देतांना  अकोलामधील मिडीयाने पोलीस यंत्रणेला दोषी ठरवित ताशेरे ओढले. परंतु  कोणताही धडा न घेता दि.1 ऑक्टोबर  (गुरूवार) रोजी  जिल्ह्यातील आकोट शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यावरील वाहतुक पोलीस हे गणवेशातच वाहतूक यंत्रणा वारावर सोडुन पोपटखेड धरणावर   फोटो शेसन करत बसले.
त्याच्या सोबत ज्या वृत्तपत्रातुन पोलीस यंत्रणा अपघाताला दोषी ठरविते. त्या देशोन्नतीचे वृत्तपत्राचा उपसंपादक, पत्रकार व दिव्य मराठीचा प्रतिनिधी   यांनी फोटो काढण्याची हौश भागविली. या गंभीर प्रकाराची दखल एकाही वृत्तपत्राने घेतली नाही. याबाबत अकोला जिल्ह्यात सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहे.
याबाबत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक मिना साहेब काय कायवाई करतात? पत्रकारांची वाहतुक पोलीसांशी असलेली अती लगटामुळे देशोन्नतीच्या भुमिकाबाबत वृत्तपत्रक्षेत्रात उलट-सुलट शंका व्यक्त करणारी चर्चा आहे.