संजीव शाळगावकर यांचे अभिनंदन

मराठी मीडियामध्ये एखाद्या न्यूज चॅनल मालकांविरूध्द कर्मचा-यांची बाजू घेवून मुख्य संपादकांनेच पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे उदाहरण विरळच. पुण्यात नव जागृती चॅनलच्या मालकांने कर्मचा-यांची घोर फसवणूक केल्यानंतर मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी येरवाडा पोलीस चौकीत रितसर तक्रार दाखल केलेली आहे.राज गायकवाड भविष्यात याच येरवाड्यात जाणार असल्याचा हा पहिला दाखला आहे.
नव जागृती चॅनल जानेवारीमध्ये सुरू झाले आणि अवघ्या सहा महिन्यातच बंद पडले.मालकांने कर्मचा-यांचा पगार कसाबसा दिला,नंतर मात्र टोलवा टोलवी सुरू केली.तारखावर तारखा दिल्या,आश्वासनावर आश्वासने दिली,चेक दिले पण सर्व थोतांड निघाले.त्यांनी कर्मचा-यांच्या पाठीत अक्षर:शा खंजीर खुपसला आहे.तरूण पत्रकारांचे भविष्य त्यांनी उद्ध्वस्त केले आहे.
अनेक तरूण इतर चांगल्या ठिकाणी नोकरी सोडून या चॅनलमध्ये जॉईन झाले होते,आता त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आलेली आहे.अनेक तरूण पुण्यात भाड्याने राहात होते,त्यांच्यावर रूम सोडण्याची पाळी आली.पगार नसल्यामुळे त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.या चॅनलमध्ये काही महिन्यापुर्वी एक वाळवी लागली होती.त्यामुळेच सारे समीकरण बदलले.मालकाच्या डोक्यात हवा घालण्याचे काम त्यांनी करून जय महाराष्ट्र केला.ऐवढेच काय शेळीचे ४२० कलम लिहून दीड लाख रूपये पगार वसूल केला आणि पुढचा भाग लिहिण्याअगोदर शेळपटाप्रमाणे xxx शेपूट घातले.
या माणसाला कधीच स्वत:चा फेस नाही.समोरला बोलू न देणे याची ही सवय.याला दूरदर्शनने हाकलून लावल्यानंतर त्याने एका विद्यापीठातही असाच नंगानाच केला.साम,पुन्हा साम करत आता छम् छम् मध्ये जॉईन झाला आहे.
असो,मुळ विषय आहे,जागृतीच्या मालकास धडा शिकवण्याचा.मराठवाड्यातील एका स्ट्रिंन्जर रिपोर्टरने या मालकांविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे अगोदरच तक्रार दाखल केलेली आहे.त्याची चौकशी सुरू झालेली आहे.मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होणे महत्वाचे होते.ते स्वत: मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी केले आहे.
संपादक असावा तर असा.नाही तर शेळीचे कलम ४२० लिहून स्वत:ची तुंबडी भरली की,शेळपटाप्रमाणे वागणारे अनेकजण आहेत.शाळगावकर यांना सर्व कर्मचा-यांचा पाठींबा तर आहेच,परंतु त्यांनी कसलीही परवा न करता,जे धाडस दाखवले त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन.
शाळगावकर साहेब,तुम्ही आता मागे हटू नका,आम्ही तुमच्या सोबत आहोत.कर्मचा-यांची बाजू घेवून मालकांविरूध्द थेट पोलीस ठाणे गाठणारे शाळगावकर खरेच ग्रेट.