दिव्य मराठीच्या कथनी आणि करणी मध्ये फरक

दिव्य मराठीने दर सोमवारी नो निगेटिव्ह न्यूज सुरु केली आहे. या दिवशी दिव्य मराठी तसेच भास्कर वृत्तपत्र पॉझीटिव्ह न्यूज ला प्राधान्य देतात. हा एक चांगला प्रयत्न आहे. मात्र भास्कर ग्रुपच्या कथनी आणि करणी मध्ये फरक आहे.

मजेठिया आयोग लावण्याचे आदेश झाल्याने दिव्य मराठीने विदर्भातील अनेक रिपोटर्स चे राजीनामे घेतले. बुलढाणा तसेच यवतमाळच्या एकूण  9 जनांचे राजीनामे तर एकाच दिवशी घेण्यात आले. त्यांच्याकडून कौटूंबिक कारणाने राजीनामे घेत असल्याचे लिहून घेण्यात आले. अमरावती येथील सुध्दा अनेक जनांना कामावरुन काढण्यात आले आहे. बदलीच्या धमक्या देऊन सुध्दा कारवाई करण्यात येत आहे. सरकारने पत्रकारांसाठी काहीतरी चांगले करण्याचा निर्णय घेतला तर त्यात वृत्तपत्रांचे मालक आडकाठी आनण्याचा प्रयत्न करीत आहे.

एकीकडे अशी हलकट वृत्ती ठेवायची आणी दुसरीकडे सोमवारी पॉझीटिव्ह न्यूज चा ढिंडोरा पिटायचा हा विरोधाभास मनाला पटण्यासारखा नाही. दिव्य मराठी ने मी नाही त्यातली आणी कडी लावा आतली ही प्रवृत्ती सोडायला हवी. भास्कर ग्रुपच्या या कार्याचे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी सुध्दा केले आहे. विदेश दौ ऱ्यात असतांना त्यांनी भारतातील या कार्याचा उल्लेख केल्याचे भास्करवाले सतत सांगत आहे. परंतु मजेठिया आयोग लागु करता येऊ नये म्हणून त्यांनी राज्यातील एप्रिल तसेच मे 2015 याा दोन महिण्यात किती जनांचे राजीनामे घेतले, त्यांच्या दूरवर बदल्या केल्या अथवा त्यांना परमनंट नोकरीवरुन 
काढून त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसीस वर कमी पगारात कामावर ठेवले हे त्यांनी घोषीत करायला हवे. पॉझीटिव्ह विचारसरणीच्या लोकांनी पॉझिटिव्ह राहीले पाहीजे. सर्वप्रथम वर्धेचे कार्यालय बंद करुन तेथील कर्मचाऱ्यांना वा ऱ्यावर सोडण्यात आले. चांगली नोकरी सोडून हे कर्मचारी दिव्य मराठीत आले होते. आता बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला च्या पत्रकारांना काढण्यात आले. नागपूर चा सुध्दा नंबर असल्याची माहिती आहे. निगेटिव्ह वृत्ती कायम ठेऊन नो निगेटिव्ह न्यूज चा डंका पिटणाऱ्या भास्करने नो निगेटिव्ह न्यूजचा डंका पिटने बंद करावे. 

पंतप्रधानांनी सुध्दा अशा हलकट प्रवृत्तीच्या लोकांचा नामोल्लेख टाळला पाहीजे. आता दिव्य मराठी वाले सोमवारी बलात्कार अथवा चोरी खुनाच्या बातमीमध्ये सर्वात वर नकारात्मक बातमी असा उल्लेख करतात. असे त्यांनी केले नाही तर झालेला बलात्कार हा सकारात्मक होण्याची शक्यता असावी. वाचकांना सुध्दा सामाजिक कार्य अथवा बलात्कारामधला फरक समजत नसावा म्हणून दिव्य मराठीवाले बातम्यांच्या वर अशी टिपणी टाकत असावे. विशेष म्हणजे सोमवारी नो निगेटिव्ह न्यूज आणि मंगळवार पासून मात्र पुन्हा तमाशा सुरु असेच काही दिसून येत आहे.
 सोमवारी पॉझीटिव्ह न्यूज टाकल्यानंतर मंगळवारी दिनांक 16 जून 2015 रोजी दिव्य मराठी अकोला आवृत्तीमध्ये मुख्य अंकात 7 कॉलम 14 वर्षाच्या मुलीने पळविले 5 लाखाचे दागीणे ही बातमी प्रकाशित करण्यात आली. 14 वर्षाची बालिका आहे तिच्या आई वडीलांनी दुसरे लग्न केले. त्या मुलीवर संस्कार कसे पडले असतील. तीला मदत मिळेल असे काहीतरी कृत्य करण्याऐवजी तीने 5 लाखाचे दागीने पळविलयाची 7 कॉलम लिड करण्यात आली. सामाजिक दृष्ट्या वृत्तपत्रांनी अशा बातम्यांना स्थान द्यायला नको. दिव्य मराठीवाले किती ग्रेट आहेत यावरुन याची प्रचिती येते. सोमवारी नो निगेटिव्ह न्यूज आणी मंगळवारी पुन्हा काटे री बातम्या टाकणाऱ्यांना समज केव्हा येईल. आता तर अनेक पत्रकांरांना कामावरुन काढल्यामुळे दिव्य मराठीचा दर्जा आणखी दिव्य होईल यात शंकाच नाही.