जय महाराष्ट्रमध्ये दोन कार्यकारी संपादक राहणार...

मुंबई - होय,बेरक्याने महिन्याभरापुर्वी दिलेली न्यूज तंतोतंत खरी ठरली आहे.एबीपी माझाचे स्टार एंकर प्रसन्न जोशी यांनी माझाला रामराम केलाय.त्यांनी एक महिन्यापुर्वीच प्रशासनाकडे राजीनामा दिला होता,तो मंजूर करण्यात आलाय.
प्रसन्न जोशी आता जय महाराष्ट्र चॅनलमध्ये कार्यकारी संपादक म्हणून जुलैच्या पहिल्या आठवड्यात ज्वाईन होणार असल्याचे वृत्त बेरक्याकडे आले आहे.जोशी जय महाराष्ट्रमध्ये गेल्यामुळे आता पुर्वीचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचे काय होणार,असा प्रश्न निर्माण झाला होता.परंतु मिळालेल्या माहितीनुसार आठवले आणि जोशी हे दोघेही कार्यकारी संपादक राहणार आहेत.एकाकडे इनपूट तर एकाकडे आऊटपूटची जबाबदारी राहणार आहे.गरज पडल्यास जय महाराष्ट्रमध्ये एडिटर इन चिफ पदावरही एका मोठ्या पत्रकाराची वर्णी लागू शकते.जोशी जय महाराष्ट्रमध्ये ज्वाईन होत असल्यामुळे त्यांचे एबीपी माझामधील जुने स्पर्धक माणिक मुंडे यांचा पत्ता आपोआप कट झालेला आहे.

माझाचे तीन मुख्य मोहरे गळाले...

अनेक वर्षे नंबर १ वर राहिलेल्या एबीपी माझाचे एकामागून एक तीन मोहरे गळाले आहेत.आऊटपूर हेड माणिक मुंडे यांना एका मुलीच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता.मुंडे सध्या साममध्ये आऊटपूट हेड आहेत.
त्यानंतर एक महिन्यापुर्वी स्टार रिपोर्टर निलेश खरे यांनी राजीनामा दिला होता.खरे सध्या मी मराठीमध्ये आहेत.त्यानंतर आता स्टार एंकर प्रसन्नजोशी यांनी माझाला रामराम करून जय महाराष्ट्रचा रस्ता धरला आहे.

माझामध्ये आता स्टार एंकर कोण ?

एबीपी माझामध्ये रात्री ९ वाजता माझा विशेष हा शोचे मेन एंकर प्रसन्न जोशी होते.ते आता माझामधून बाहेर पडल्यामुळे या शोची जबाबदारी आता कोणाकडे जाणार,याकडं लक्ष वेधलं आहे.ही जबाबदारी मिलींद भागवत आणि विलास बडे यांच्याकडे जावू शकते,अशी चर्चा आहे.