'बेरक्या'चे आवाहन :

महाराष्ट्रातील तमाम पत्रकार मित्रहो, तुम्ही असे मुळीच समजू नका की तुम्ही एकटे आहात. भलेही तुमच्या आनंदात राहू देत पण संकटाच्या समयी 'बेरक्या' तुमच्या पाठीशी ठामपणे  उभा आहे. तमाम महिला पत्रकार या आमच्या भगिनी आहेत. त्यांचा मान-सन्मान आणि स्वाभिमानाची जपणूक व्हायलाच हवी. 'बेरक्या' सदैव आपणा सर्वांच्या साथीला उभा आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्राने आजवर इन-हाउस अशा महिला छळाच्या तक्रारींचे निवारण करणारी समिती स्थापन केलेली नाही. महिलांना पत्रकारितेत काम करणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेय. माता-भगिनींच्या हित रक्षणासाठी शीर तळहाती घेवून लढल्याचा इतिहास सांगणारा महाराष्ट्र आमचा... आज आम्ही इतके बधीर, अलिप्त का झालो आहोत? नाही चालणार हे असे यापुढे...  हक्काने आवाज द्या. तुमची दु:ख, चिंता, व्यथा, वेदना आम्हाला नि:संकोच कळवा. अनेकदा मालक मंडळीही वाईट नसतात. प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानी योग्य जाईलच असे नाही. मधले  दलाल हरामखोरी करतात. यापुढे आम्ही मालक आणि कर्मचारी, अगदी शेवटचा घटक यातील दुवा बनून .... आम्ही तुमचा आवाज बनून मालकांपर्यंत पोहोचू... आपल्याला संघर्ष नव्हे  तोडगा हवाय.... लढाई नव्हे न्याय हवाय... चला, एकमेकांच्या साथीने पत्रकारितेतील आपलं जगणं सुसह्य करूया ...
'बेरक्या'कडे ई-मेल berkya2011@gmail.com या आयडीवर पाठवा. आपली ओळख पूर्णत: गुप्त राखली जाईल.
 
प्रिंट तसेच टीव्ही/वेब मीडियातील सर्व पत्रकार मित्रहो, कंत्राटी, एक वर्षे-तीन वर्षे करार किंवा कोणत्याही स्वरूपातील कर्मचारी, व्हाउचरवर सेवा देणारा पत्रकार-वार्ताहर तसेच वृत्तपत्रातील कोणत्याही विभागात काम करणारे कर्मचारी ..... आपल्याला जर कुणी अचानक कामावरून कमी केले किंवा उद्यापासून कामावर येवू नको सांगितले, कुणी राजीनामा दे म्हणून दबाव आणत असेल, किंवा कोणत्याही मार्गाने वरिष्ठ छळत असतील तर सर्वप्रथम ऑनलाईन तक्रार महाराष्ट्र शासनाच्या लेबर कमिशनरकडे म्हणजे कामगार विभागाकडे दाखल करा. तुमच्याकडे नियुक्तीपत्र असो किंवा नसो, तुम्ही लेबर/वर्कमन असो की मैनेजरीअल पोजिशन होल्डर ... सर्वप्रथम तक्रार करा ... ते अगदी सहज-सोपे आहे. लक्षात ठेवा आपली हक्काची लढाई सर्वप्रथम आपण स्वत: लढायला शिका ... काही अडले, साथ हवी असेल, मार्गदर्शन हवे असेल तर 'बेरक्या' आहेच..
 
प्रिंट तसेच टीव्ही/वेब मीडियातील पत्रकारितेतील माता-भगिनीनो, आपला जर कार्यालयात/'वर्कप्लेस'च्या ठिकाणी छळ होत असेल, कुणी त्रास देत असेल, लगट-लंपटपणा-लोचटपणा करत असेल, मुद्दाम आडवे-तिडवे बोलणे, शेरेबाजी किंवा इशारेबाजी करत असेल, वरिष्ठ कामाच्या निमित्ताने मुद्दाम छळत असतील तर आपण आता अगदी सहज ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता...