अरेरे, कुठे नेवून ठेवलात रे पेशा पत्रकारितेचा !

धक्कादायक! संतापजनक!!
नेत्यांच्या चरणी लोटांगण घाला, मस्त 'दिवाळी' मिळवा!
अरेरे, जळगाव जिल्ह्यातील 'काही' पत्रकारांनी पत्रकारितेच्या स्वाभिमानाची लाज घालाविली, शान घालाविली!
अरेरे, कुठे नेवून ठेवलात रे पेशा पत्रकारितेचा!
काल, शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी जळगावातील काही 'निवडक' (की निवडलेले/सोयीचे!) इलेक्ट्रोनिक आणि प्रिंटचे पत्रकार कोर्टाच्या आदेशाने धुळ्यात तुरुंगात असलेले घरकुल घोटाळ्यातील दोन मुख्य आरोपी सुरेशदादा जैन (शिवसेना उमेदवार, जळगाव शहर) आणि गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी उमेदवार, जळगाव ग्रामीण) यांना भेटण्यास गेले होते.
यादीत न्यायालयाची कशी दिशाभूल, फ़सवणूक, अवमान झाला ती स्वतंत्र गोष्ट नंतर बघूयात. मीडियाशी संबंध नसलेल्या जाहिरात संस्थेचे तीन पत्रकार दाखविले गेले, एक खासगी व्हीडीओग्राफर नेला गेला। कुणी ही फ़सवणूक कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली तर! असो.
नि:पक्ष, निर्भीड नसलेल्या जळगावातील काही आघाडीच्या माध्यमांच्या 'काही' पत्रकारांनी चक्क एका तुरुंगातील राजकारण्याच्या चरणी लोटांगण घातले, पायावर लोळण घेतली! पत्रकारितेला लीन-दीन केले, जेलरसह/उमेदवारासह सारेच ओशाळले? ज्युनिअर भांबावले; त्यांना पत्रकारितेत आल्याची लाज वाटली; असले लाचार आणि हुजरे 'वर' असल्याची लाज वाटली!
भलेही कुणी विकासपुरुष अतीव आदरास पात्र असेल; वैयक्तिक त्याचे आशीर्वाद घेण्यास त्याच्या घरी कुणी गेले आणि एकट्यात पाय चाटले तरी कुणी आक्षेप घेणार नाही! मात्र, जबाबदार चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी ज्यावेळी आरोपाच्या भोवरयातील तिसरया स्तंभाच्या समोर जातात तेव्हा त्याने ताठ मानेने, निधड्या छातीने सामोरे जायला हवे! आरोपी ते आहेत; त्यांना स्पष्टीकरण द्यायचेय, त्यासाठी त्यांनी कोर्टाला 'विनंती' करून चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधीना बोलावलेय. मग चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधींनीच ते आरोपी असल्यासारखे, त्यांना स्पष्टीकरण द्यायचे असल्यासारखे लाचार होवून का जावे? चौथ्या स्तंभाची लाज, अब्रू आणि प्रतिष्ठा घालविणारयांचा मी, जाहीर निषेध करतो!
पत्रकारितेच्या प्रतिष्ठेचे 'मानबिंदू' जे जपू शकत नाहीत ते 'महाराष्ट्राचा' जनतेच्या 'मत' अन 'लोक'इच्छेचा काय 'मानबिंदू' जपणार?
असले लाचार कसले जनतेच्या 'मनमनातले' वृत्तपत्राच्या पानापानात' उतरवून जळगाव 'नगरी'छे 'पुण्य' कसले कमावणार?
हे कसली नव्या पीढीतील पत्रकारांना 'नवी आशा' दाखवून, जनतेचे 'दूत' बनून हे कसले नवा 'देश' अन त्याला 'नवी दिशा' दाखविणार?
आघाडी नसेल, ताकद नसेल पण स्वाभिमान आणि स्वत्व, ताठा आणि कणा तसेच पत्रकाराचा बाणा जपणारे भास्कर, देशोन्नती, तरुण भारत, बातमीदार, सत्य वाचा, जनवास्तव, एरंडोल वार्ता, आव्हान, साईमत, पुण्यप्रताप, खानदेश एक्सप्रेस, जळगाव प्रहार, कृषि एक्सप्रेस, जळगाव एक्सप्रेस, एग्रो वर्ल्ड, जनशक्ति, मर्डर, ग्रामस्थ, लोकसत्ता, मटा, सामना, गांवकरी, आपला महाराष्ट्र, पथयात्री, जळगाव माझा, शिवानी समाचार वैगेरे सर्वांचा मला अभिमान वाटतोय! मित्रांनो, तुम्ही पत्रकारितेची आण-बाण-शान टिकवून ठेवलीत, तुमचे पुनश्च अभिनंदन!
(काही नावे नजरचुकीने राहून गेली असल्यास दिलगीर आहे!)

From
विक्रांत पाटील, कार्यकारी संपादक - जनशक्ति, जळगाव
+91 7767012222/8007006862
vikrant@janashakti.in